August 16, 2024 1:13 PM August 16, 2024 1:13 PM

views 18

कोलकाता अत्याचार निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनची एक दिवसाच्या देशव्यापी संपाची घोषणा

  कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा निषेध देशभरात विविध प्रकारे नोंदवण्यात येत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनं उद्या एक दिवसाचा संप पुकारला असून, या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील असं सांगितलं आहे. या दुर्घटनेनंतर कोलकाता रुग्णालयात झालेल्या तोडफोडीचाही इंडियन मेडिकल असोसिएशनं निषेध केला आहे.   याप्रकाराची दखल कोलकाता उच्च न्यायालयाने आपणहून घेतली असून, हे राज्यसरकारचं अपयश असल्याची टीका केली आहे.भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या मुद्द्यावर देशभरात...

August 14, 2024 5:03 PM August 14, 2024 5:03 PM

views 17

निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप मागे

कोलकाता इथल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय कडं सोपवण्याचे आदेश काल उच्च न्यायालयाने दिल्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटना फोर्डा ने देशव्यापी संप मागे घेतला आहे. सीबीआयच्या पथकानं ताली पोलीस स्थानकातून एफआयआरची प्रत ताब्यात घेतली असून चार डॉक्टरांची चौकशीही केली आहे. मुंबईत मार्डने पुकारलेला संप आजही सुुरुच असून मुंबईतल्या केईएम, सायन आणि नायर सारख्या रुग्णालयात डॉक्टर कामावर नाहीत. आपत्कालीन सेवा मात्र सुरुच ठेवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.