September 16, 2024 7:51 PM September 16, 2024 7:51 PM
3
कोलकात्याच्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
कोलकात्याच्या आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या सुनावणीत सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या तीन सदस्यीय पीठासमोर या प्रकरणाचा ताजा अहवाल सादर होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक झालेले महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि तळा पोलीस ठाण्याचे माजी प्रभारी अधिकारी अभिजित मंडल यांना काल न्यायालयानं ३ दिवसांची सीबीआय कोठडी दिली.