December 13, 2025 8:56 PM December 13, 2025 8:56 PM

views 12

कोलकात्यातल्या सॉल्ट लेक कार्यक्रमाच्या आयोजकाला अटक

दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सी १४ वर्षांनंतर पुन्हा भारतभेटीवर आला आहे. गोट इंडिया टूर या खासगी दौऱ्याच्या निमित्तानं तो आज पहाटे कोलकात्यात दाखल झाला.  कोलकात्यातल्या सॉल्ट लेक मैदानावर  हजारो चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. मेस्सीनं चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केलं. पण तो तिथे काही मिनिटंच थांबून निघून गेला. हजारो रुपयांची तिकिटं काढून आलेल्या चाहत्यांमध्ये यामुळे नाराजी पसरली आणि त्यांनी मैदानाच्या दिशेनं रिकाम्या बाटल्या, खुर्च्या भिरकावल्या. यामुळे तिथे काही काळ तणावाचं वात...

August 25, 2024 7:30 PM August 25, 2024 7:30 PM

views 12

कोलकातातल्या आरजी कर रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरु

कोलकाता इथल्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामधल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं आज सकाळी १५ ठिकाणी भेट देऊन तपासणी केली. सीबीआयचं पथक आरजी करचे माजी प्राचार्य डाॅ संदीप घोष यांची त्यांच्या निवासस्थानी चौकशी करत आहेत. तसंच सीबीआय महाविद्यालयातचे नवे प्राचार्य आणि उपप्राचार्य यांची चौकशी करत आहे. याशिवाय आरजी करचे प्राध्यापक डॉ. देबाशीष सोम, माजी वैद्यकीय अधीक्षक आणि उपप्राचार्य डॉ. संजय वशिष्ठ आणि वैद्यकीय सामुग्री पुरवठादार बिप्लव सिंग यांची देखील सीबीआय त्यांच्या निवासस्थानी चौक...

August 20, 2024 10:29 AM August 20, 2024 10:29 AM

views 15

कोलकत्याच्या आर जे कार रुग्णालयातल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकारकडून विशेष तपास पथक स्थापन

पश्चिम बंगाल सरकारने आर जे कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक प्रनब कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय विशेष तपास पथक तयार केलं आहे. 2021 पासूनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी केली जाणार असून एका महिन्यात हे पथक आपला अहवाल सादर करेल. कोलकत्यातल्या सागोर दत्त वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच कॉलेज ऑफ मेडिसीनमधल्या परिचारिकांनी काल या प्रकरणी निषेध फेरीत सहभाग घेत पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. रुग्णालयाच्या आवारात या परिचारि...

August 16, 2024 1:13 PM August 16, 2024 1:13 PM

views 18

कोलकाता अत्याचार निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनची एक दिवसाच्या देशव्यापी संपाची घोषणा

  कोलकाता इथं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा निषेध देशभरात विविध प्रकारे नोंदवण्यात येत आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनं उद्या एक दिवसाचा संप पुकारला असून, या काळात अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील असं सांगितलं आहे. या दुर्घटनेनंतर कोलकाता रुग्णालयात झालेल्या तोडफोडीचाही इंडियन मेडिकल असोसिएशनं निषेध केला आहे.   याप्रकाराची दखल कोलकाता उच्च न्यायालयाने आपणहून घेतली असून, हे राज्यसरकारचं अपयश असल्याची टीका केली आहे.भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज या मुद्द्यावर देशभरात...

August 15, 2024 8:26 PM August 15, 2024 8:26 PM

views 22

कोलकात्यातल्या R. G. कार वैद्यकीय महाविद्यालयात तोडफोड, ९ जणांना अटक

पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यातल्या R. G. कार वैद्यकीय महाविद्यालयात काही व्यक्तींनी काल रात्री तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली असून २६ जणांची ओळख पटली आहे. महिला डॉक्टरच्या अत्याचार आणि खून प्रकरणी सीबीआयचं पथक आज या ठिकाणी पोहोचलं. दुसरं पथक महिलेच्या घरी गेलं आहे.