July 7, 2024 6:55 PM July 7, 2024 6:55 PM

views 15

कोल्हापूर : नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतून गोरगरीबांना आरोग्य सेवा देण्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन

पंधराव्या वित्त आयोगातून उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतून शहरातल्या गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा सुविधा देण्याचं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात केलं. कोल्हापूर महापालिकेच्यावतीनं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या तीन नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.   या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत नागरीकांवर मोफत औषधोपचार केला जाणार आहे. यामुळे खासगी दवाखान्यावर नागरिकांचा होणारा खर्च कमी होईल,अ...

June 20, 2024 7:34 PM June 20, 2024 7:34 PM

views 14

कोल्हापूर : तिलारी घाटात अवजड वाहनांची वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

कोल्हापूर जिल्ह्यातल्या तिलारी घाटातली अवजड वाहनांची वाहतूक ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसामुळे घाटातल्या रस्त्यांचे संरक्षण कठडे जीर्ण झाल्यामुळे अपघाताचा धोका असल्याने सावधानता म्हणून ही वाहतूक बंद करण्यात आली आहे. अवजड वाहनांना आंबोली घाट आणि कर्नाटकातला चोर्ला घाट हे दोन पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत.