October 5, 2024 7:37 PM October 5, 2024 7:37 PM

views 10

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं आश्वासन

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणं आणि देशात जातनिहाय जनगणना करण्याचं आश्वासन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिलं आहे. राज्यघटना वाचवण्यासाठी हे दोन सर्वांत महत्त्वाचे मार्ग असल्याचं त्यांनी कोल्हापूर इथं संविधान सन्मान संमेलनात सांगितलं. जातनिहाय जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे आणि यासंबंधीचा कायदा आम्ही संसदेत मंजूर करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.    तत्पूर्वी, कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधी यांनी केलं. छत्रपती ...

September 7, 2024 1:22 PM September 7, 2024 1:22 PM

views 3

कोल्हापूर इथल्या श्री अंबाबाई देवीच्या चरणी दोन आठवड्यात तब्बल  ८० लाखांचे दागिने अर्पण

कोल्हापूर इथल्या श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांनी गेल्या दोन आठवड्यात तब्बल  ८० लाखांचे दागिने अर्पण केले आहेत. एका भाविकाने ५० लाख रुपयांचा सोन्याचा सिंह अर्पण केला आहे तर गोव्याच्या प्रतापसिंह राणे यांच्या कुटुंबियांनी तीस लाख रुपयांचे सोन्याचे तोडे आणि कोल्हापुरी साज अर्पण केला.

August 23, 2024 3:43 PM August 23, 2024 3:43 PM

views 4

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद

बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आज कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पुकारला आहे. शहरातली बहुतांश दुकानं, शाळा-महाविद्यालयं बंद असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शहर परिवहन उपक्रमासाह खासगी वाहतूक व्यवस्थाही बंद असल्यानं कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना पायपीट करावी लागली.  भाऊसिंगजी रोड, दसरा चौक, पापाची तिकटी या परिसरात घोषणा देणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. घोषणाबाजीमुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं.

August 21, 2024 1:20 PM August 21, 2024 1:20 PM

views 13

कोल्हापुरात नेमबाज स्वप्नील कुसळेचं जल्लोषात स्वागत

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतला कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसळे याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज कोल्हापुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या स्वागत मिरवणुकीत  नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थी, खेळाडू  देखील सहभागी झाले होते.     

August 13, 2024 7:01 PM August 13, 2024 7:01 PM

views 12

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी बचत गटांसाठी कार्यशाळांचे आयोजन

महिलांमधे आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक कार्यशाळा आयोजित करते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा, भुदरगड आणि राधानगरी तालुक्यातील बचत गटांसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळांत फसवणुकीसाठी वापरल्या जात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारांची आणि त्यापासून वाचण्यासाठीच्या उपायांची माहिती देण्यात आली. कोणत्याही अमिषाला बळी न पडता सतर्क राहून आर्थिक व्यवहार करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.

August 9, 2024 3:31 PM August 9, 2024 3:31 PM

views 11

कोल्हापूरातल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीत रंगमंच जळून खाक

कोल्हापूरातल्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागली. या आगीमुळे जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत नाट्यगृहाचा रंगमंच जळून खाक झाला. नाट्यगृहाचा काही भाग तसंच छतही कोसळलं आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. नाट्यगृहाचा बहुतांश भाग लाकडाचा असल्यामुळे आग भराभर पसरली. केशवराव भोसले यांची आज १३४ वी जयंती आहे, या दिवसाच्या पूर्वसंध्येलाच अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हे नाट्यगृह नव्याने उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू अशी ग्वाही...

August 1, 2024 3:40 PM August 1, 2024 3:40 PM

views 13

कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातले ७५ बंधारे पाण्याखाली असून, २३ मार्ग बंद आहेत. सांगली जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे आयर्विन पुलाजवळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.   पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढले काही दिवस जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ...

July 31, 2024 3:29 PM July 31, 2024 3:29 PM

views 6

पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्याच्या विविध भागात सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सखल भागांमध्ये पाणी भरू लागलं आहे. धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं, दोन्ही जिल्ह्यातल्या नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.

July 27, 2024 9:50 AM July 27, 2024 9:50 AM

views 10

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचं संकट

  कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागात पाणी घुसू लागलं असून, नागरिकांचं स्थलांतर सुरू आहे. दूध, भाजीपाला वाहतूक ठप्प झाली आहे. अधून मधून कोसळणाऱ्या सरी वगळता पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचा विळखा‌ अद्याप कायम आहे. यामुळे २६५ मालमत्तांची पडझड झाली असून जिल्ह्यात आज पर्यंत ९८.६२ लाख रुपयांचं नुकसान नुकसान झाल्याची माहितीजिल्हा प्रशासनानं दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरएफ चे एक पथक या पूर्वीच दाखल झाले असून आणखी एक पथक आज दाखल होणार आहे. आगामी १० दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस राहणार असून...

July 23, 2024 8:05 PM July 23, 2024 8:05 PM

views 7

कोल्हापुरात पावसाची बॅटींग, पंचगंगा नदी दुथडी भरून वाहली

कोल्हापुरात पावसाची संततधार सुरू असल्यानं पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. राधानगरी धरण ९० टक्के भरलं आहे. पावसाचा जोर कायम असल्यानं धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. कोयना धरणातून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु केल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.   गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी विविध धरणांमधून मोठा विसर्ग होत असल्यानं अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं जिल्ह्यातल्या २० मार्गांवरची ...