September 16, 2025 8:22 PM September 16, 2025 8:22 PM
28
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट
कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव आता राज्याच्या प्रमुख महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं या महोत्सवाला अधिकृत मान्यता दिली आहे. या दसरा महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, लोकनृत्यं, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन तसंच शिवकालीन युद्धकलांच्या सादरीकरणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.