August 23, 2025 2:44 PM August 23, 2025 2:44 PM

views 12

कोल्हापूरमध्ये दगडफेकीत 8 जण जखमी

कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर परिसरात काल किरकोळ वादाचं रुपांतर दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीत झालं. या घटनेत एका पोलीस उपनिरीक्षकासह आठजण जखमी झाले असून सहा वाहनांचं मोठं नुकसान झालं.   इथल्या उद्यानासमोर लावलेले फलक आणि ध्वनिक्षेपक एका गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी उतरवल्यानंतर दुसऱ्या गटातल्या लोकांनी दगडफेकीला सुरुवात केली. दुसऱ्या गटानेही दगडफेक केली. सुमारे तासभर हा प्रकार सुरू झाला. त्यातच एका गटाने परिसरातल्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करायला सुरुवात केली. पोलिसांनी बंदोबस्त वाढवून दो...

August 17, 2025 8:36 PM August 17, 2025 8:36 PM

views 112

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या उपस्थितीत झालं. या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे.    कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातल्या नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी दूर जावं लागतं, ही अडचण दूर करण्यासाठी हे सर्किट बेंच महत्त्वाचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई उद्घाटनपर भाषणात म्हणा...

June 27, 2025 4:24 PM June 27, 2025 4:24 PM

views 18

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन, लोकार्पण तसंच भूमिपूजन समारंभ ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते होणार

कोल्हापूर चित्रनगरीमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण तसंच पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचा भूमिपूजन समारंभ, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या सकाळी होणार आहे. गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध विकास कामांमध्ये रेल्वे स्टेशन चित्रीकरण स्थळ, नवीन वाडा, चाळ, मंदिर, अंतर्गत रस्ते, दोन वसतीगृहे इत्यादी कामांचा समावेश आहे. नागरिकांसाठी कोल्हापूर चित्रनगरी उद्या निशुल्क खुली ठेवण्यात आली आहे. ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शाहू स्मारक इथं उ...

March 27, 2025 7:05 PM March 27, 2025 7:05 PM

views 12

कोल्हापुरात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

कोल्हापूर जिल्ह्यात विविध विकासकामं सुरू असून त्या कामांचा दर्जा आणि गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ते आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातल्या प्रमुख विकास प्रकल्पांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

February 14, 2025 3:15 PM February 14, 2025 3:15 PM

views 19

कोल्हापूरमध्ये जीबीएसग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू

कोल्हापूरच्या चंदगड इथं गुईलेन बॅरे सिंड्रोमग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर गेल्या काही दिवसांपासून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू होते. या आजारामुळं राज्यात झालेला हा ९वा मृत्यू आहे. राज्यात गुईलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

February 8, 2025 7:35 PM February 8, 2025 7:35 PM

views 14

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेचा वर्ष २०२५-२६ साठीचा ९४० कोटी रुपयांचा आराखडा सरकारला सादर

कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेचा वर्ष २०२५-२६ साठीचा ९४० कोटी रुपयांचा आराखडा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सरकारला सादर करण्यात आला. केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण लवकरात लवकर पूर्ण करणं, मधाचं गाव पाटगाव अंतर्गत चांगल्या प्रतीच्या शुद्ध मधाचं उत्पादन वाढवून रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

January 29, 2025 9:40 AM January 29, 2025 9:40 AM

views 13

कोल्हापूर, लातूरमध्ये जीबीएसचे रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यातही जीबीएसचे दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये एका १२ वर्षीय मुलीचा आणि ६० वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. दोन्ही रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचं, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी सांगितलं.   लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही जीबीएसचे दोन संशयित रुग्ण दाखल झाले होते. तपासणी अहवालात एका रुग्णाला हा संसर्ग नसल्याचं स्पष्ट झालं असून, दुसऱ्या रुग्णाचा अहवाल येणं बाकी आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.उदय मोहिते पा...

December 27, 2024 6:55 PM December 27, 2024 6:55 PM

views 8

कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून ९ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश जारी

कोल्हापूर  जिल्ह्यात यात्रा, उत्सव, विविध पक्षांची आंदोलन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी संपूर्ण जिल्ह्यात उद्या सकाळी ६ वाजल्यापासून ९ जानेवारी २०२५ ला रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा हुकूम सर्व जाती धर्माचे सण,उत्सव,जयंती, यात्रा शांततामय मार्गानं साजरे करण्यासाठी जमलेल्या जनसमुदायासाठी, लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, अंत्ययात्रा इत्यादींना लागू नाही

November 4, 2024 7:13 PM November 4, 2024 7:13 PM

views 15

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंची माघार

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागं घेतला. काँग्रेसनं राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करुन मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे लाटकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर  गेल्या काही दिवसांपासून माघारीसाठी राजेश लाटकर यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र लाटकर माघार घ्यायला तयार झाले नाहीत त्यामुळे मुदत संपण्याच्या १० मिनिटं आधी मधुरिमाराजे यांनीच अर्ज मागे घेतला.

October 14, 2024 3:04 PM October 14, 2024 3:04 PM

views 8

कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाचं भूमीपूजन

कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाचं भूमीपूजन आज झालं. याकरता शासनाने २५ कोटी १० लाख रुपये निधी जाहीर केला असून येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यावेळी उपस्थित होते. ८ ऑगस्टला हे नाट्यगृह आगीत जळून खाक झालं होतं.