November 23, 2024 6:31 PM

views 28

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या कारवाईत मुंबई विमानतळावर ३५ कोटी रुपये किमतीचं कोकेन जप्त

डीआरआय अर्थात  महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबई विमानतळावर  काल  केलेल्या कारवाईत एक संशयिताला सुमारे ३५ कोटी रुपये किमतीचं सुमारे साडे तीन किलो  कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली. हा संशयित लायबेरियाचा नागरिक असून  त्याच्या सामानात अमली पदार्थांची दोन मोठी पाकिटे सापडली. जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महसूल गुप्तचर संचालनालयानं  अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात कडक कारवाई सुरु केली आहे.