August 23, 2025 3:35 PM August 23, 2025 3:35 PM
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी साडेतीनशे एसटी बस आणि एका रेल्वेगाडीची मोफत सुविधा
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी मुंबई भाजपने साडेतीनशे एसटी बस आणि एका रेल्वेगाडीची मोफत सुविधा जाहीर केली असून आजपासून त्या सेवेचा प्रारंभ झाला. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज बांद्रा कुर्ला संकुलातून पहिल्या एसटी बसला भगवा झेंडा दाखवून रवाना केलं. येत्या काळात मुंबईच्या विविध भागांमधून या बसेस सोडल्या जातील तसंच २५ ऑगस्ट रोजी एक विशेष रेल्वेगाडीदेखील कोकणात रवाना होणार असल्याचं शेलार यांनी यावेळी सांगितलं.