January 5, 2026 6:56 PM

views 30

राष्ट्रीय खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचं विजेतेपद कायम

४४ व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय खोखो स्पर्धेत काल झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रानं ओदिशावर ३४-३३ असा विजय मिळवत विजेतेपद कायम राखलं. तर, मुलांमधे यजमान कर्नाटकानं गतविजेत्या महाराष्ट्रावर ३५-३० अशी मात करत विजेतेपद पटकावलं. मुलांमधे उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्नेहा लामकानेनं जानकी पुरस्कार पटकावला. मुलांमधे बी. विजय वीर अभिमन्यू पुरस्काराचा मानकरी ठरला.  वरीष्ठ गट राष्ट्रीय खो खो स्पर्धा येत्या ११ ते १५ तारखेदरम्यान तेलंगणात काझिपेट इथं होणार आहे.