January 24, 2026 3:50 PM

views 12

गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी १० आरोपींना जन्मठेप

गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांच्या हत्येप्रकरणी १० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने दिली आहे.यातले २ जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून इतर ८ आरोपींना अटक करण्याती प्रक्रीया सुरु असल्याचं पोलीसांनी सांगितलं. २०१९ मधे अकोला शहरातल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात हुंडीवाले यांची हत्या झाली होती. याप्रकरणी १५ जणांवर आरोपपत्र दाखल झालं होतं. ५ आरोपींची अकोला जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.