June 2, 2025 3:15 PM June 2, 2025 3:15 PM

views 15

देशातल्या सहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्रं मिळाल्याची केंद्र सरकारची माहिती

देशातल्या सहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांची डिजिटल ओळखपत्रं बनवण्यात आली आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीत या माहितीचा समावेश आहे. या ओळखपत्रांद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी, पशुधन, पिकांची माहिती आणि त्यातून मिळालेलं उत्पन्नाची नोंद केली जाणार आहे. या ओळखपत्रांचा उपयोग पीकविमा तसंच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या लाभात होणार आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे १ कोटी ३० लाख शेतकऱ्यांची ओळखपत्र तयार करण्यात आली आहेत. तर महाराष्ट्रत ९९ लाख, मध्य प्रदेशात ८३ लाख, आंध्र प्र...

February 26, 2025 10:16 AM February 26, 2025 10:16 AM

views 28

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा शेतकऱ्यांना फायदा

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आत्तापर्यंत दहा लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरीत करण्यात आली असून त्याचा फायदा सात कोटी ७२ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड खात्यांअंतर्गत २०१४मध्ये असलेल्या ४.२६ लाख कोटी रुपयांवरून वाढून ती डिसेंबर २०२४ मध्ये दुप्पट म्हणजे 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

December 22, 2024 3:42 PM December 22, 2024 3:42 PM

views 15

मच्छिमारांना मिळणार किसान क्रेडीट कार्डचा लाभ

मासेमारी करणाऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डचा लाभ घेता येणार आहे. मासेमारी करणारे मच्छिमारांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासह प्रधानमंत्री मत्स्य  किसान सह-समृद्धी योजनेअंतर्गत मत्स्य व्यावसायिक, मच्छिमार सहकारी संस्था आदींची नोंदणीही करण्यात येत आहे. १५ मार्च २०२५ पर्यंत याबाबतची मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दुग्ध व्यवसाय विकास विभाग इमारतीतल्या मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.