September 15, 2025 3:15 PM September 15, 2025 3:15 PM

views 20

भारतीय समाज हा कायमच एक समावेशक समाज – केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री

भारतीय समाज हा कायमच एक समावेशक समाज राहिल्याचं प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात इथे भाषा वारसा आणि सांस्कृतिक अभ्यास केंद्राचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, तेव्हा ते बोलत होते.   ही फक्त एका अभ्यासक्रमाची सुरुवात नाही, तर भारताच्या सांस्कृतिक वारशात रुजलेल्या त्याच्या उज्ज्वल भविष्याच्या पायाचं मजबुतीकरण असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाशी संलग्न विविध संस्थांमधल्या शिक्षकांचा सत्कार...

April 2, 2025 1:12 PM April 2, 2025 1:12 PM

views 12

वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्याचं राजकारण न करता तर्काच्या आधारे विरोध करावा- किरेन रिजिजू

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गरीब मुसलमानांच्या हिताचा विचार करत असून विरोधी पक्षांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्याचं राजकारण न करता तर्काच्या आधारे विरोध करावा, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. विधेयक सादर करण्यापूर्वी नवी दिल्ली इथे संसद परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.

November 10, 2024 6:11 PM November 10, 2024 6:11 PM

views 21

भाजपा संविधान बदलणार असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला जनता बळी पडणार नाही – मंत्री किरेन रिजीजू

भाजपा संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप काँग्रेस करत असून, आता जनता त्याला बळी पडणार नाही, असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.    २०१४ पासून देशाचा जो विकास झाला तितका विकास यापूर्वी कधीही झाल्याचं दिसलं नाही. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा झपाट्यानं विकास करण्याचं श्रेय २०१४ नंतर आलेल्या महायुती सरकारला द्यावं लागेल, असं ते म्हणाले. यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, आणि इतर नेते उपस्थित होते. 

September 29, 2024 1:54 PM September 29, 2024 1:54 PM

views 10

मंत्री किरेन रिजीजू यांनी मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा

जागतिक हृदय दिनानिमित्त केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी आज नवी दिल्लीत इंडिया गेट ते भारत मंडपम दरम्यानच्या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये दीडशे रुग्ण आणि १०० डॉक्टरांहून अधिक जणांनी सहभाग घेतला होता. हृदयाच्या आरोग्याची जपणूक करण्याचं आवाहन करत रिजीजू यांनी यावेळी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. 

August 8, 2024 3:58 PM August 8, 2024 3:58 PM

views 12

लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक सादर

लोकसभेत आज वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२४ अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केलं. यात वक्फ कायदा १९९५ मध्ये सुधारणा करुन राज्य वक्फ बोर्डांचे अधिकार आणि कार्यप्रणाली तसंच वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि सर्वेक्षणाशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. अल्पसंख्याकांना न्याय देण्यासाठी हा कायदा आणण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षानं या विधेयकाला विरोध केला असून सर्वपक्षीय बैठक बोलाव...