October 10, 2024 3:05 PM

views 8

आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किरण जॉर्जचा पुरुष एकेरीच्या उपउपांत्य पूर्व फेरीत प्रवेश

फिनलँड इथं सुरू असलेल्या आर्क्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत काल भारताच्या किरण जॉर्ज याने पुरुष एकेरीच्या उपउपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेल्या तैवानच्या वांग त्झू वेई याचा २३-२१, २१-१८ अशा सरळ गेममध्ये पराभव केला. आज किरण याचा सामना इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्तीशी होणार आहे.