August 27, 2025 8:09 PM August 27, 2025 8:09 PM
35
वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात झालेल्या भूस्खलनात आत्तापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याठिकाणी अजूनही मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जम्मूमध्ये २४ तासात ३८० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या १०० हून अधिक वर्षांत २४ तासांत झालेला हा विक्रमी पाऊस आहे. दोडा जिल्ह्यातही पावसाशी निगडीत दुर्घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल राष...