March 27, 2025 1:37 PM

views 28

बालमृत्यू रोखण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्रांकडून प्रशंसा

आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे भारताने बालमृत्यू रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्रांनी एका अहवालात काढले आहेत. आरोग्य क्षेत्रात धोरणात्मक गुंतवणूक करून भारताने लाखो बालकांचे प्राण वाचवल्याचं या अहवालात म्हटलं आहे.   भारताने २००० पासून पाच वर्षांखालच्या बालकांच्या मृत्यूदरात ७० टक्के आणि नवजात बालकांच्या मृत्यूदरात ६१  टक्के घट करण्यात यश मिळवलं आहे. यासाठी आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढवण्यात आली, पायाभूत सुविधा आणि संसाधनाच्या विकासासाठी उपाययोजना क...