July 5, 2025 3:16 PM July 5, 2025 3:16 PM

views 18

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतचा उपांत्यफेरीत प्रवेश

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतनं चमकदार खेळ करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चोऊ टीएन चेन चा केवळ ४३ मिनिटांत २१-१८, २१-९ असा सरळ सेट मध्ये  पराभव केला. उपांत्यफेरीत आज श्रीकांतचा सामना जपानच्या केंटा निशिमोटो बरोबर होणार आहे.

May 23, 2025 7:02 PM May 23, 2025 7:02 PM

views 14

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत किदांबी श्रीकांत उपांत्य फेरीत दाखल

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं आज पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.  उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात फ्रान्सच्या तोमा जुनिअर पोपोवला नमवत श्रीकांतनं उपांत्य फेरीत आगेकूच केली आहे.           भारताच्या  मिश्र दुहेरीची तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिल या   जोडीला    मात्र आज पराभव पत्करावा लागला.  चीनच्या वेई याक्सिन आणि जियांग झेनबॅंग या जोडीनं त्यांच्यावर २४-२२, २१-१३ असं अशी मात  केली.  त्यामुळं तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिल या जोडीचं  आव्हान संपुष्टात आलं अ...

September 26, 2024 6:48 PM September 26, 2024 6:48 PM

views 22

खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज किदाम्बी श्रीकांतचा सामना आयुष शेट्टीशी होणार

मकाऊ इथं सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत आज दुपारी भारताच्या किदाम्बी श्रीकांतचा सामना भारताच्याच आयुष शेट्टीशी होणार आहे. तर महिला एकेरीत आज भारताच्या तस्निम मीरचा सामना जपानच्या तोमोका मियाकाझीशी होणार आहे. महिला दुहेरीत भारताच्या गायत्री गोपीचंद आणि त्रिसा जॉली या जोडीचा सामना तैवानच्या लिन चिह-चुन आणि तेंग चुन-सुन यांच्याशी होईल.