October 14, 2025 1:23 PM October 14, 2025 1:23 PM
46
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे अध्यक्ष उख्ना यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून चर्चेनंतर काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणं अपेक्षित आहे. सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि लोकशाही मूल्यांमधील समानतेमुळे १९५५ पासून गेली ७० वर्ष भारत आणि मंगोलिया यांच्यात बहुस्तरीय घनिष्ठ भागीदारी प्रस्थापित झाली आहे. प्रथमच भारत भेटीवर आलेले मंगोलियाचे अध्यक्ष आज संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत. ...