January 20, 2025 7:09 PM January 20, 2025 7:09 PM

views 5

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य

भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पहिल्यावहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावलं आहे. काल रात्री झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघांनी वेग, रणनिती आणि कौशल्याचं उत्तम प्रदर्शन केलं. भारतीय पुरुष संघाने नेपाळला ५४-३६ असं नमवत विश्वचषकावर नाव कोरलं तर महिला संघानं नेपाळच्या महिला संघाला ७८-४० अशी मोठ्या फरकानं मात दिली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यांमध्ये भारतानं पहिल्यापासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि नेपाळला रोखून धरलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आण...