April 4, 2025 7:29 PM April 4, 2025 7:29 PM

views 18

५७व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाला विजेतेपद

ओडिशातल्या पुरी इथं झालेल्या ५७ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघानं विजेतेपद पटकावलं, तर पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात दिमाखदार खेळी करत आज महाराष्ट्राच्या महिला संघानं यजमान ओडिशावर २५-२१ असा विजय मिळवला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १०-१० असे बरोबरीत होते. मात्र, दुसऱ्या डावात महाराष्ट्रानं अचूक डावपेच आणि दमदार बचाव करत सामना जिंकला. पुरुष गटातल्या अंतिम सामन्यात रेल्वेच्या संघानं गतविजेत्या महाराष्ट्रावर ३६-२८ असा विजय मिळवला.   

January 16, 2025 9:38 AM January 16, 2025 9:38 AM

views 5

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघाचा उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजयी घोडदौड सुरु ठेवत उपान्त्य पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष संघानं काल पेरु संघाचा ७०- ३८ असा, तर महिला संघानं इराणचा १०० - १६ अशा मोठ्या गुण फरकाने पराभव केला.  

January 15, 2025 9:30 AM January 15, 2025 9:30 AM

views 5

खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ विजयी

खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दोन्ही संघांनी काल चमकदार कामगिरी करत विजयाची नोंद केली. प्रियांका इंगळे हिच्या नेतृत्वातील भारतीय महिला संघानं काल सलामीच्या सामन्यात दक्षिण कोरियावर 175-18 असा दणदणीत विजय मिळवला. तर अटी-तटीच्या झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष संघानंही ब्राझीलवर 64-34 गुणांनी मात केली. भारतीय पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वाईकरला 'सामनावीर' म्हणून गौरवण्यात आलं. पबरी साबरला सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं.

January 14, 2025 1:57 PM January 14, 2025 1:57 PM

views 8

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी

खो-खो विश्वचषक स्पर्धेला काल नवी दिल्ली इथे सुरुवात झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा आणि भारतीय खोखो महासंघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी मशाल प्रज्ज्वलित करून स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन केलं.    या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नेपाळवर ४२-३७ असा विजय मिळवला. भारतीय संघाचा आदित्य गणपुले याची सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली तर शिवा रेड्डी सर्वोत्कृष्ट आक्रमक खेळाडू ठरला. नेपाळच्या संघाकडून रोहित कुमार या खेळाडू...