April 4, 2025 7:29 PM

views 33

५७व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाला विजेतेपद

ओडिशातल्या पुरी इथं झालेल्या ५७ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघानं विजेतेपद पटकावलं, तर पुरुष संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यात दिमाखदार खेळी करत आज महाराष्ट्राच्या महिला संघानं यजमान ओडिशावर २५-२१ असा विजय मिळवला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १०-१० असे बरोबरीत होते. मात्र, दुसऱ्या डावात महाराष्ट्रानं अचूक डावपेच आणि दमदार बचाव करत सामना जिंकला. पुरुष गटातल्या अंतिम सामन्यात रेल्वेच्या संघानं गतविजेत्या महाराष्ट्रावर ३६-२८ असा विजय मिळवला.   

April 4, 2025 10:58 AM

views 16

खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

जगन्नाथ पुरी इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत पुरुष संघानं पश्चिम बंगालवर मात केली.   तर महिला गटात महाराष्ट्र संघानं कोल्हापूरचा पराभव केला. आज उपांत्य फेरीचे सामने होणार असून राज्याच्या पुरुष संघाचा ओडिशा संघाबरोबर आणि महिला संघाचा दिल्लीच्या संघाबरोबर सामना होणार आहे.

January 17, 2025 1:52 PM

views 26

विश्वचषक खोखो स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिल संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

विश्वचषक खोखो स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या आणि महिलांच्या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला असून आपापल्या गटात दोन्ही संघ अव्वल स्थानावर आहेत.   नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पुरुषांच्या संघानं काल भूतानवर ७१-३२ असा विजय मिळवला. तर महिला संघानं मलेशियावर १००-२० अशी मात केली.

January 12, 2025 11:22 AM

views 43

महिलांच्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत प्रियंका इंगळे भारतीय संघाची कर्णधार

भारतात होणाऱ्या महिलांच्या खो-खो विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली असून,संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केज तालुक्यातील कळमंबा गावची प्रियंका इंगळे हिची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.   प्रियंका सध्या प्राप्ती कर सहाय्यक म्हणून कार्यरत असून क्रीडा अधिकारी परीक्षेतही ती उत्तीर्ण झाली आहे.