May 15, 2025 8:07 PM May 15, 2025 8:07 PM

views 3

क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेमुळे भारत जगात उदयाला येत आहे – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

क्रीडा क्षेत्रातल्या क्षमतेमुळे भारत एक सुप्त शक्ती म्हणून जगात उदयाला येत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलं. सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची सांगता आज बिहारमधे पटना इथं पाटलीपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या.    या स्पर्धेत ५८ सुवर्ण आणि ४७ रौप्य पदकांसह १५८ पदकं मिळवून महाराष्ट्रानं अव्वल साथान पटकावलं. हरियाणानं ३९ सुवर्ण आणि २७ रौप्य पदकांसह एकूण ११७ पदकं मिळवून दुसरे स्थान पटकावलं. तर राजस्थान २४ सुवर्ण पदकांसह ६० प...

May 15, 2025 7:42 PM May 15, 2025 7:42 PM

views 12

खेलो इंडिया स्पर्धेत १५८ पदकं जिंकत महाराष्ट्र अव्वल

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ५८ सुवर्ण आणि ४७ रौप्य पदकांसह १५८ पदकं मिळवून महाराष्ट्र पदकतालिकेत अग्रस्थानी आहे. हरियाणाने जोरदार कामगिरी करत ३९ सुवर्ण आणि २७ रौप्य पदकांसह एकूण ११७ पदकं मिळवून दुसरे स्थान पटकावलं. राजस्थान २४ सुवर्ण पदकांसह ६० पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे.    सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची आज सांगता होत आहे. बिहारमधे पटना इथं पाटलीपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात हा सोहळा सुरू आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी...

May 15, 2025 4:06 PM May 15, 2025 4:06 PM

views 4

खेलो इंडिया स्पर्धांचा आज समारोप

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांची आज सांगता होणार आहे. बिहारमधे पटना इथं  पाटलीपुत्र क्रीडा प्रेक्षागृहात हा सोहळा होईल. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, इतर प्रशासकीय अधिकारी, क्रीडाक्षेत्रातले इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.   ७व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र पदकतालिकेत ५६ सुवर्ण आणि ४५ रौप्य पदकांसह १४९ पदकं मिळवून  अग्रस्थानी आहे. हरियाणाने काल जोरदार कामगिरी करत ३५ सुवर्ण आणि २६ रौप्य पदकांसह एकूण १०७ पद...

May 14, 2025 8:08 PM May 14, 2025 8:08 PM

views 2

खेलो इंडियामधे १४२ पदकांसह महाराष्ट्र अव्व्लस्थानी कायम

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत, आज महाराष्ट्राची एकूण पदक संख्या १४२ झाली आहे. सध्या ५४ सुवर्ण, ४४ रौप्य आणि ४४ कांस्य पदकं मिळवून महाराष्ट्र पदक तालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. ३० सुवर्ण आणि २३ रौप्य पदकांसह ९६ पदकं मिळवून हरयाणा दुसऱ्या तर राजस्थान ५२ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. कर्नाटकाकडेही ५२ पदकं असली तरी सुवर्ण पदकांची संख्या कमी असल्याने त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. खेलो इंडिया स्पर्धेचा आज ११वा दिवस असून उद्या समारोप होईल.

May 4, 2025 9:05 PM May 4, 2025 9:05 PM

views 20

बिहारमध्ये ७व्या ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे’ला सुरुवात

सातव्या ‘खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धे’ला आजपासून बिहारमधे सुरुवात झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाटणा इथे  या स्पर्धांचं उदघाटन झालं. या स्पर्धेत २८ क्रीडाप्रकारांमध्ये देशातले सुमारे साडेआठ हजार खेळाडू सहभागी होतील. यातल्या नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहेत.

May 4, 2025 3:27 PM May 4, 2025 3:27 PM

views 4

बिहारमध्ये ७व्या खेलो इंडिया स्पर्धेला आजपासून सुरुवात

सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला आजपासून बिहारमधे सुरुवात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज संध्याकाळी पाटणा इथे  या स्पर्धांचं उदघाटन होणार आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यावेळी उपस्थित असतील. बिहारमधल्या पाटणा, राजगिर, गया, भागलपूर आणि बेगुसराय या ठिकाणी स्पर्धांचं आयोजन होणार असून २८ क्रीडाप्रकारांमध्ये देशातले सुमारे साडेआठ हजार खेळाडू सहभागी होतील. यातल्या नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंगच्...