August 21, 2025 1:32 PM August 21, 2025 1:32 PM
10
श्रीनगरमधल्या दाल सरोवरात खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाला सुरुवात
जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथल्या दाल सरोवरात आजपासून येत्या २३ ऑगस्टपर्यंत तीन दिवसीय खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरची संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याचा उत्सव म्हणून हा महोत्सव साजरा होत आहे. खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सवाचा शुभंकर हिमालयीन किंगफिशरपासून प्रेरित आहे, जो साहस, ऊर्जा आणि निसर्गाशी असलेलं खोल नातं सांगतो. या महोत्सवात एकूण ३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले ५०० पेक्षा जास्त खेळाडू रोइंग, कॅनोइंग आणि कायाकिंग या स्पर्धात्मक क्रीडा स्प...