August 23, 2025 8:15 PM

views 14

खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धेचा समारोप

जम्मू आणि काश्मीरमध्ये  श्रीनगरच्या दल सरोवरात गेले तीन दिवस सुरु असलेल्या खेलो इंडिया जलक्रीडा स्पर्धेचा आज समारोप झाला. यात नौकानयन, कयाकिंग आणि कनोइंग स्पर्धांचा समावेश होता. मध्य प्रदेशचा  संघ १८ पदकं मिळवून प्रथम स्थानावर आहे. ओडिशा आणि केरळ अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. महाराष्ट्र २ पदकांसहित आठव्या स्थानावर आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण तसंच जम्मू आणि काश्मीर क्रीडा परिषदेतर्फे ‘खेलो इंडिया’ उपक्रमाअंतर्गत प्रथमच या जलक्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होत.   

August 14, 2025 8:22 PM

views 15

खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचा लोगो आणि शुभंकर चिन्हाचं अनावरण

पहिल्यावहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सवाचा लोगो आणि शुभंकरचिन्हाचं अनावरण आज श्रीनगर इथं झालं. हिमालयीन खंड्या हे या कार्यक्रमाचं शुभंकरचिन्ह असून याच्या लोगोमध्ये काश्मीरचं निसर्गसौंदर्य रेखाटण्यात आलं आहे. ही स्पर्धा श्रीनगरच्या दल लेक इथं २१ ते २३ ऑगस्टदरम्यान होणार आहे. यात ३६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधून ४००पेक्षा जास्त खेळाडू रोविंग, कनूइंग आणि कायाकिंग या स्पर्धांमध्ये भाग घेतील.