May 8, 2025 1:37 PM May 8, 2025 1:37 PM

views 5

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये ३४ पदकांची कमाई करून महाराष्ट्र अव्वल स्थानावर

बिहारमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये १६ सुवर्ण, १४ रौप्य आणि १४ कांस्य पदकांची कमाई करून तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.   पदक तालिकेत राजस्थान दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. सायकलिंग मध्ये आकांक्षा म्हेत्रे हिनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण तर सिद्धेश घोरपडे यानं रौप्य पदकाची कमाई केली.

March 26, 2025 9:21 AM March 26, 2025 9:21 AM

views 5

Khelo India Para Games : महाराष्ट्रतील खेळाडूंनी पटकावली १४ सुवर्णपदकं

नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत १४ सुवर्णपदकांसह एकंदर ३६ पदकं पटकावली आहेत. यात मैदानी स्पर्धांमधल्या १० सुवर्णपदकांचा समावेश आहे. भालाफेकमध्ये एफ १३ या प्रकारात प्रतीक पाटीलनं कास्यपदक तर कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिनं महिलांच्या गोळाफेकमध्ये रौप्यपदक जिंकलं. महिलांच्या एफ ५६ प्रकारात मीना पिंगाने हिनं थाळीफेक करत तिसरं स्थान मिळवलं. राजश्री कासदेकर हिनं भालाफेकमध्ये कास्यपदक प्राप्त केलं.

March 24, 2025 8:11 PM March 24, 2025 8:11 PM

Khelo India Para Games : पॉवरलिफ्टर्स आणि नेमबाजांची उल्लेखनीय कामगिरी

नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा गेम्समधे आज पाचव्या दिवशी पॉवरलिफ्टर्स आणि नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. सुमन देवींनी ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं असून जास्मिन मिचलिनने रौप्यपदक आणि भारती अग्रवालनं कांस्यपदक पटकावलं. पुरूष ५९ किलो वजनी गटात गुलफाम अहमदने सुवर्णपदक पटकावलं असून व्ही. सरवनने रौप्यपदक आणि गौरवने कांस्यपदक पटकावलं. सीमा राणीने ६१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं असून झैनब खातूनने रौप्यपदक आणि एम. नाथियाने  कांस्यपदक पटकावलं आहे. जॉबी ...

March 20, 2025 10:22 AM March 20, 2025 10:22 AM

views 4

खेलो इंडिया स्पर्धांच्या दुसऱ्या आवृत्तीला आजपासून प्रारंभ

दिव्यांगांसाठीच्या खेलो इंडिया स्पर्धांच्या दुसऱ्या आवृत्तीला आजपासून नवी दिल्ली इथं प्रारंभ होत आहे. या स्पर्धांमध्ये 36 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील १३०० हून अधिक खेळाडू सहभागी घेणार आहेत. 27 तारखेपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. नवी दिल्ली इथं जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम आणि डॉक्टर करणसिंग नेमबाजी संकुल अशा तीन ठिकाणी या स्पर्धा पार पडणार आहेत. दरम्यान, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे 78 क्रीडापटू पात्र ठरले आहेत. सर्वाधिक 36 खेळाडू अॅथलेटिक्समध्ये भाग घेणार आ...