May 25, 2025 1:49 PM May 25, 2025 1:49 PM

views 5

खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स स्पर्धेत महाराष्ट्राला १२ पदकांची कमाई

दीव दमण समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या खेलो इंडिया बीच स्पोर्ट्स स्पर्धेत काल पाचव्या दिवशी महाराष्ट्राच्‍या संघाने पेंचक सिलट प्रकारात  ३ सुवर्ण, ४ रौप्‍य आणि ५ कास्य अशी एकूण १२ पदकांची कमाई करत उपविजेतेपद पटकावलं.  बीच सॉकरमध्ये महाराष्ट्र पुरुष संघाने कास्यपदक मिळवलं. ५ सुवर्ण, ५  रौप्‍य, १० कास्य अशी २० पदकं जिंकून महाराष्ट्र पदक तालिकेत दुसऱ्या स्‍थानावर आहे.