May 23, 2025 12:01 PM May 23, 2025 12:01 PM

views 5

इंडिया बीच स्पर्धेत महाराष्ट्र प्रथम स्‍थानावर

दीवच्‍या घोघला समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेल्‍या खेलो इंडिया बीच स्पर्धेत 4 सुवर्ण, 4 रौप्‍य आणि 6 कास्य पदकांसह 14 पदकांची लयलूट करत महाराष्ट्राने प्रथम स्‍थानावर झेप घेतली आहे. कालच्या तिसऱ्या दिवशी 50 ते 55 किलो वजनी गटात जयश्री शेटे हिने सुवर्ण कामगिरी केली. रामचंद्र बदक आणि सचिन गर्जे, ओंकार अभंग, वैभव काळे आणि अंशुल कांबळे यांनी आपापल्या गटात रौप्‍य पदकं पटकावली. कबड्डीमध्ये महिला गटात  महाराष्ट्राने उपांत्‍य फेरीत प्रवेश केला.

May 8, 2025 1:37 PM May 8, 2025 1:37 PM

views 6

खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये ३४ पदकांची कमाई करून महाराष्ट्र अव्वल स्थानावर

बिहारमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये १६ सुवर्ण, १४ रौप्य आणि १४ कांस्य पदकांची कमाई करून तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.   पदक तालिकेत राजस्थान दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे. सायकलिंग मध्ये आकांक्षा म्हेत्रे हिनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण तर सिद्धेश घोरपडे यानं रौप्य पदकाची कमाई केली.

May 7, 2025 8:20 PM May 7, 2025 8:20 PM

views 5

Khelo India : महाराष्ट्राच्या नेमबाजांनी पटकावलं सुवर्णपदक

बिहारमधे सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धांमधे महाराष्ट्राच्या नेमबाजांनी आज सुवर्णपदक मिळवलं. वेदांत वाघमारेने ५० मीटर थ्री रायफल पोझिशन्स प्रकारात ४५२ पूर्णांक ५ दशांश गुण मिळवून सुवर्णपदक पटकावलं. महिलांमधे प्राची गायकवाडने त्याच प्रकारात ४५८ पूर्णांक ४ दशांश गुण मिळवून सुवर्णपदक मिळवलं

March 27, 2025 7:57 PM March 27, 2025 7:57 PM

views 7

खेलो इंडिया पॅरा स्पर्धांचा समारोप

खेलो इंडिया पॅरा गेम्स स्पर्धेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला. आज शेवटच्या दिवशी झालेल्या खेळांमध्ये टेबिल टेनिसच्या अंतिम फेरीत शशिधर कुलकर्णी, दत्तप्रसाद ज्योतिराम चौगुले आणि विश्वविजय तांबे यांनी विविध श्रेणींमध्ये सुवर्णपदकं जिकंली. तर महिलांच्या गटात देवयानी वाल्हे हिनंही सुवर्णपदक जिंकलं.    या स्पर्धेत महाराष्ट्र ४३ पदकासंह पदकतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यात १८ सुवर्ण, १३ रौप्य आणि १२ कास्य पदकांचा समावेश आहे. पहिल्या स्थानावर हरयाणा असून त्यानंतर तामिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान ...

March 23, 2025 8:42 PM March 23, 2025 8:42 PM

views 5

Khelo India : नेमबाजी स्पर्धेमध्ये सागर कातळेला सुवर्णपदक

नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरागेम्सच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सागर बाळासाहेब कातळे याने १० मीटर एअर रायफल प्रोन मिक्स्ड एसएच वन प्रकारात सुवर्णपदक मिळवलं आहे. मोना अग्रवाल हिने या रौप्य तर दीपक सैनी याने कांस्यपदक जिंकलं आहे. काल भारताची पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती अवनी लेखरा हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच वन प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं होतं. 

March 20, 2025 8:08 PM March 20, 2025 8:08 PM

views 6

नवी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन

खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन आज नवी दिल्ली इथे केंद्रीय क्रीडा आणि युवाव्यवहार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलं. या स्पर्धेतले खेळ दिल्लीत तीन ठिकाणी आयोजित केले असून, १ हजार ३००हून अधिक खेळाडू ६ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. यात बॅडमिंटन, ॲथलेटिक्स, तिरंदाजी, पॉवर लिफ्टिंग, नेमबाजी अशा खेळांचा समावेश आहे.

January 27, 2025 12:41 PM January 27, 2025 12:41 PM

views 6

खेलो इंडिया हिवाळी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचा आज समारोप

खेलो इंडियाच्या हिवाळी स्पर्धांच्या पहिल्या टप्प्याची आज सांगता होत आहे. भारतीय लष्कर आणि भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या पुरुष संघांमधे आईस हॉकीमध्ये आज अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकं जिंकून, पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.

January 24, 2025 9:33 AM January 24, 2025 9:33 AM

views 3

खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांना लेह-लडाखमधल्या क्रीडा संकुलात सुरुवात

केंद्रसरकारच्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांना काल लेह -लडाख इथल्या नवांग डोरजी क्रीडा संकुल इथ सुरुवात झाली. 27 जानेवारीपर्यंत होणाऱ्या या क्रीडा स्पर्धांच्या पहिल्या टप्प्यात मुख्यतः बर्फावर खेळल्या जाणाऱ्या आईस हॉकी आणि स्केटिंग याच्या स्पर्धा होणार आहेत.   दुसऱ्या टप्प्यात 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान जम्मू काश्मीर इथ 4 प्रकारच्या बर्फातील क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहेत यामध्ये देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या 19 पथकातील 4 शे हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहे...