July 15, 2024 7:49 PM July 15, 2024 7:49 PM
8
राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पेरणीला पोषक वातावरण तयार
राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरणीला पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे शेतात पेरण्यांना वेग आला असून अनेक ठिकाणी पेरणीची कामं उरकत आली आहेत. नाशिक जिल्ह्यात ६ लाख हेक्टरपेक्षा जास्त खरीपाचं क्षेत्र असून यापैकी चार लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. येवला तालुक्यातली खरीपाची पेरणी पूर्ण असून इतर तालुक्यातही ८५ टक्के पेरण्या झाल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण चांगलं असल्यामुळे भात पिकाच्या लागवडीसाठी अनुकूल वाता...