November 26, 2025 8:01 PM November 26, 2025 8:01 PM

views 14

देशात यंदा खरीप पिकांचं विक्रमी उत्पादन अपेक्षित

देशात यंदा खरीप पिकांचं विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. त्यात अन्नधान्याच्या  उत्पादनात ३८ लाख ७० हजार टनांनी वाढ होईल असा अंदाज आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यंदाच्या खरीप हंगामातल्या उत्पादनाचे अंदाज देणारा पहिला अहवाल आज नवी दिल्लीत प्रकाशित केला. देशात यंदा अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं असलं तरी अनेक भागात चांगला पाऊस झाल्यानं पिकांना फायदा झाला असल्याचं चौहान यांनी सांगितलं. एकूण अन्नधान्य उत्पादन १७ कोटी ३३ लाख ३० हजार टन होण्याची शक्यता आहे.

October 6, 2025 8:23 PM October 6, 2025 8:23 PM

views 24

खरीप हंगामात देशात ११ कोटी २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी

यंदाच्या खरीप हंगामात ११ कोटी २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भाताचं पेरणी क्षेत्र सरासरी ४ कोटी ३ लाख हेक्टरहून अधिक होतं ते यंदा ४ कोटी ४१ लाख हेक्टरपेक्षा जास्त झालं आहे. कापसाचं पेरणी क्षेत्र सरासरी १ कोटी २९ लाख हेक्टर होतं ते यंदा १ कोटी १० लाख हेक्टरपर्यंत खाली आलं आहे.   मक्याच्या पेरणी  क्षेत्रात यंदा १२ टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाल्यानं भरडधान्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. गेल्या चार वर्षात सरासरी ७८ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पेरला गेला. या...

May 19, 2025 8:18 PM May 19, 2025 8:18 PM

views 15

खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळणार !

यंदा चांगला पावसाळा होईल असा अंदाज आहे, त्यामुळे खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत आवश्यक ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. ते आज नाशिक जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व बैठकीत बोलत होते. खत विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा कोकाटे यांनी दिला.    नाशिक जिल्ह्यात यंदा ६ लाख ४४ हजार हेक्टर क्षेत्र खरिपाच्या लागवडीसाठी प्रस्तावित आहे. त्या संदर्भात कोकाटे यांनी आढावा घेतला. यावेळी कृषी योजनांच्या मा...

October 21, 2024 9:19 AM October 21, 2024 9:19 AM

views 12

खरीप पीक विम्यासाठी ७६ लाख ३६ हजारहून अधिक दावे

राज्यात खरीप पीक विम्यासाठी ७६ लाख ३६ हजारहून अधिक दावे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे दाखल केल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली आहे. याचे सर्वेक्षण सुरू असून नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती लवाटे यांनी दिली. दाखल दाव्यांपैकी ७६ लाख २० हजार २४४ दावे ऑनलाईन स्वरुपात तर १६ हजार ६२३ दावे प्रत्यक्ष दाखल झाले आहेत. एकट्या बीड जिल्ह्यातून सर्वाधिक १० लाख ८७ हजार ९४४ दावे दाखल झाले तर नांदेड जिल्ह्यातून ८ लाख ९ हजार २३५ दावे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या...

August 20, 2024 7:30 PM August 20, 2024 7:30 PM

views 4

देशात खरीप पिकांच्या पेरणीत यंदा लक्षणीय प्रगती

देशात खरीप पिकांच्या पेरणीत यंदा लक्षणीय प्रगती दिसून येत आहे. आतापर्यंत १० कोटी ३१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी ३ कोटी ६९ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात, तर १ कोटी ८१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर तृणधान्यांची पेरणी झाली आहे. १ कोटी १३ लाख ७० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कडधान्य, तर १ कोटी ८६ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे.

July 17, 2024 7:07 PM July 17, 2024 7:07 PM

views 11

खरीप हंगाम २०२३च्या पीक स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल जाहीर

राज्यात खरीप हंगामातल्या पिकांसाठी २०२३ मध्ये घेतलेल्या खरीप हंगाम स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल जाहीर झाले आहेत. यात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल अशा ११ पिकांचा समावेश आहे.    या स्पर्धेच्या, भात सर्वसाधारण गटात, चंद्रकात म्हातले यांना प्रथम क्रमांक मिळाला, तर आदिवासी गटात शेवंताबाई कडाळी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. बाजरीसाठीच्या सर्वसाधारण गटात पुण्याच्या ताराबाई बांदल यांनी तर सोयाबीनच्या सर्वसाधारण गटामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाळासाहेब ...

July 12, 2024 12:48 PM July 12, 2024 12:48 PM

views 9

या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ

या वर्षीच्या खरीप हंगामात कडधान्य लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याबद्दल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आनंद व्यक्त केला आहे. नवी दिल्ली इथं खरीप पिकांच्या प्रगतीचा आढावा घेताना ते बोलत होते. तुरीसारख्या कडधान्याच्या लागवडीच्या क्षेत्रात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे. कडधान्य उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्याला प्राधान्य असेल, असं ते म्हणाले. उडीद, तूर आणि मसूर या सर्व कडधान्यांच्या १०० टक्के खरेदीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असेल असंही ते यावेळी म्हणाले.