September 10, 2024 9:45 AM September 10, 2024 9:45 AM

views 12

देशात यंदा खरीपाच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ

देशात यावर्षी खरीप पीक पेरणीत लक्षणीय प्रगती झाली आहे, एकंदर पेरणी क्षेत्र 1 हजार 92 लाख हेक्टरच्या पुढं गेलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे 1 हजार 69 लाख हेक्टर पेरणी झाली होती. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं काल खरीप पिकांखालील क्षेत्राचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. भाताचे पेरणी झालेले क्षेत्र 409 लाख हेक्टरवर पोहोचले असून, मागील वर्षीच्या याच कालावधीत ते सुमारे 393 लाख हेक्टर होते. कडधान्य लागवड 117 लाख हेक्टरवरून 126 लाख हेक्टरपर्यंत वाढली आहे. भरड धान्याची ...

September 2, 2024 8:02 PM September 2, 2024 8:02 PM

views 5

यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ

यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. १० कोटी ८७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी झाली असल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे.    ४ कोटी ८ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भात, तर १ कोटी २५ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कडधान्यांची लागवड झाली आहे. तृणधान्यांखालच्या क्षेत्रानं यंदा १ कोटी ८७ लाख हेक्टरचा टप्पा ओलांडला अ...

August 28, 2024 1:50 PM August 28, 2024 1:50 PM

views 7

खरीप पेरणीखालच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ

देशात खरीप पिकांचा पेरा यंदा वाढला आहे,  लागवडीखालचं एकूण क्षेत्र 1 हजार 65 लाख हेक्टरपेक्षा जास्त असून तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे 1 हजार 44 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं खरीप पिकांच्या पेरणीचा अहवाल प्रसिद्ध केला  त्यात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार भाताचं पेरणी क्षेत्र 394 लाख 28 हजार हेक्टरवर पोहोचलं असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीत हे  क्षेत्र 378 लाख 4 हजार हेक्टर इतकं होतं. तर कडधान्याचं क्षेत्र गेल्या वर्षी 115 लाख 55 हजा...