June 19, 2025 8:01 PM June 19, 2025 8:01 PM

views 22

चार राज्यांमधल्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक

चार राज्यांमधल्या ५ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. त्यात संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत, गुजरातमधल्या विसवदर आणि  काडी या मतदारसंघांमधे ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. केरळमधल्या निलंबुर मतदारसंघात सुमारे ७० टक्के, पश्चिम बंगालमधल्या कालीगंज मतदारसंघात ६९ टक्के, तर पंजाबमधल्या लुधियाना मतदार संधात सुमारे ४९ टक्के, मतदान झालं.  या पाचही मतदारसंधांमधली मतमोजणी येत्या सोमवारी होणार आहे. 

January 18, 2025 2:58 PM January 18, 2025 2:58 PM

views 9

केरळमधे उद्यापर्यंत मुसळधार पाऊसाची शक्यता

पंजाब, हरयाणा, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात रात्रीच्या वेळी दाट धुकं पडेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे इथं उद्यापर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे.   मच्छिमारांनी कन्याकुमारी लगतच्या समुद्र किनारपट्टी लगतचा परिसर तसंच त्यालाच लागून असलेल्या गल्फ ऑफ मुन्नार क्षेत्रात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. मच्छिमारांना उद्यापर्यंत कोमोरिन परिसर आणि लगतच...

August 3, 2024 12:53 PM August 3, 2024 12:53 PM

views 12

केरळमधल्या भूस्खलनग्रस्त भागात बचाव कार्य  युद्धपातळीवर सुरु

केरळमधल्या वायनाड जिल्ह्यातल्या भूस्खलनग्रस्त भागात लष्कराकडून मानवतावादी दृष्टीनं मदत आणि बचाव कार्य  युद्धपातळीवर सुरु आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर संस्थांचे कर्मचारी दुर्घटना स्थळी मृतदेह शोधण्यासाठी सहकार्य करत आहेत. राज्य सरकारच्या विनंतीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा तपास करण्यासाठी  एक झेव्हर रडार, चार रेको रडार आणि  विशेष तज्ञ दिल्लीहून मागवण्यात येत असल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आजच्या दिवसभर ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह काढण्यावर तसंच अत्यावश्यक सेवा पूर्...