September 6, 2024 12:53 PM September 6, 2024 12:53 PM

views 7

केरळमध्ये आजपासून १० दिवसांच्या ओणम सणाला सुरुवात

केरळमध्ये आजपासून दहा दिवसांच्या ओणम सणाला उत्साहात सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी अथम साजरा केला जातो. यानिमित्त राजा महाबली याच्या स्वागतासाठी सर्वत्र फुलांच्या  सुंदर पायघड्या घातल्या  जातात.  राजा महाबली याला भगवान विष्णूंनी  वामनाचा  अवतार घेऊन पाताळात पाठवलं होतं.  वामन जयंती आणि राजा महाबलीचं पुनरागमन  यांचं औचित्य साधून ओणम साजरा केला जातो. आजच्या पहिल्या दिवशी केरळच्या संस्कृतीचं आणि विविध कलांचं दर्शन घडवणाऱ्या मिरवणुका काढल्या जातात.