December 6, 2025 11:59 AM

views 28

केरळमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण उपक्रमाच्या वेळापत्रकात एका आठवड्याने वाढ

निवडणूक आयोगाने केरळमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण उपक्रमाच्या वेळापत्रकात एका आठवड्याने वाढ केली आहे. 11 डिसेंबर रोजी संपणारा मतदार गणनेचा टप्पा आता 18 डिसेंबरपर्यंत सुरू राहील, अशी माहिती आयोगाने काल दिली. सुधारित वेळापत्रकानुसार, मसुदा मतदार यादी 16 डिसेंबरऐवजी 23 डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर केरळ सरकारने मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रमासाठी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.

November 17, 2025 10:51 AM

views 22

केरळमध्ये मतदार यादीचं विशेष पुनरीक्षण सुरू

केरळमध्ये,मतदार यादीचं विशेष पुनरीक्षण सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत २ कोटी ६३ लाखांहून अधिक मतदारांना गणना नोंदणी अर्ज वितरित करण्यात आले आहेत, असं मुख्य निवडणूक अधिकारी रथन केळकर यांनी सांगितलं.   एकंदर मतदार संख्येच्या सुमारे ९४ टक्के लोकांना हे अर्ज देण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती प्रणालीमध्ये अद्ययावत झाल्यानंतर ही संख्या वाढण्याची शक्यता आहे असंही केळकर यांनी सांगितलं. भारतीय निवडणूक आयोगानं या महिन्याच्या ४ तारखेला नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुनरीक्षणाचा दुसरा टप्प...