November 1, 2025 12:34 PM November 1, 2025 12:34 PM

views 17

केरळ राज्याचा स्थापना दिवस

केरळ राज्याचा आज स्थापना दिवस आहे. 1956 मध्ये याच दिवशी त्रावणकोर, कोचीन आणि मालाबारच्या विलिनीकरणानंतर केरळ राज्याची निर्मिती झाली होती.   या निमित्तानं केरळमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राज्य विधानसभेचं आज विशेष सत्र बोलावण्यात आलं आहे.

October 13, 2025 5:38 PM October 13, 2025 5:38 PM

views 11

केरळमध्ये मेंदुच्या प्राणघातक संसर्गामुळे आणखी एकाचा मृत्यू

केरळमध्ये अमिबिक एन्सेफलायटिस या मेंदुच्या प्राणघातक संसर्गामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत होता. याच रुग्णालयात संबंधित संसर्गग्रस्त असलेल्या १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दूषित पाण्यामध्ये आढळणाऱ्या जिवंत अमिबामुळे हा संसर्ग होतो. गेल्या दीड महिन्यात केरळमध्ये या संसर्गामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वांनी क्लोरिनयुक्त पाणी वापरावं, तसंच अस्वच्छ तलाव आणि जलाशयांमध्ये पोहणं किंवा आंघोळ करणं टाळावं असा सल्ला केरळच...

October 12, 2025 1:01 PM October 12, 2025 1:01 PM

views 15

केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेश, आसाम, मेघायल, कर्नाटकचा समुद्रकिनारा, लक्षद्वीप, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओदिशा आणि कर्नाटकचा दक्षिणी भागातही जोरदार पावसाची शक्यताही वर्तवली आहे. पुढील चार दिवसांत केरळ, माहे, तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यांत विजांसह मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

July 31, 2025 1:38 PM July 31, 2025 1:38 PM

views 10

केरळच्या मासेमारी नौका पुन्हा समुद्रात जाण्यासाठी सज्ज

केरळच्या किनाऱ्यालगत यांत्रिक पद्धतीनं आणि  ट्रॉलर द्वारे करण्यात येणाऱ्या मासेमारीवरील प्रतिबंध आजपासून हटवण्यात आले आहेत. गेल्या ५२ दिवसांपासून ही मासेमारी बंद करण्यात आली होती. माशांच्या प्रजनन काळामुळे ही बंदी घालण्यात आली होती. आता मासेमारी नौका पुन्हा समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

July 19, 2025 8:43 PM July 19, 2025 8:43 PM

views 16

केरळात अतिशय जोरदार पाऊस, ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट

केरळात आज अतिशय जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्रविभागाने वर्तवला असून ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट दिला आहे. या ठिकाणी आज शाळांना सुट्टी दिली होती. कासारगोड आणि कन्नूरला उद्यासाठी देखील रेड ॲलर्ट दिला आहे.  वायनाडमधे गेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे मुंदक्की चूरलमाला परिसरात प्रवेशावर निर्बंध घातले आहेत.

May 24, 2025 3:59 PM May 24, 2025 3:59 PM

views 10

नैऋत्य मौसमी पाऊस वेळेआधीच केरळमध्ये दाखल

नैऋत्य मोसमी पाऊस आज वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. २००९ नंतर प्रथमच मान्सून एवढ्या लवकर सक्रिय  झाला आहे.    या पार्श्वभूमीवर केरळ, दक्षिण कोकण, कर्नाटकचा किनारपट्टी आणि घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि पश्चिम राजस्थानात रेड ॲलर्ट जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार आणि आसाममध्ये ऑरेंज ॲलर्ट देण्यात आला आहे.    राज्यात आज मराठवाड्यासह, विदर...

May 10, 2025 8:13 PM May 10, 2025 8:13 PM

views 1

नैर्ऋत्य मोसमी पावसाचं येत्या २७ मे रोजी केरळमधे आगमन होईल- हवामान विभाग

नैर्ऋत्य मोसमी पावसाचं आगमन येत्या २७ मे रोजी केरळात होईल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. यात ४-५ दिवसांचा फरक पडू शकतो.   १३ मे च्या आसपास नैर्ऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरात आणि अंदमान बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागाचे प्रवक्ते उमाशंकर दास यांनी सांगितलं. दरवर्षी मोसमी पाऊस साधारणपणे १ जून रोजी केरळात दाखल होतो.

February 26, 2025 3:21 PM February 26, 2025 3:21 PM

views 16

Ranji Trophy Final : विदर्भ आणि केरळ यांच्यात विजेतेपदासाठी लढत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी विदर्भ आणि केरळ यांच्यातल्या अंतिम सामन्याला आज नागपूरमधे सुरुवात झाली. केरळनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या सत्राच्या खेळात केरळनं अवघ्या २४ धावांमध्येच विदर्भाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले. मात्र त्यानंतर चौथ्या गड्यासाठी दानिश मालेवार यानं झुंझार शतकी खेळीसह करूण नायर याच्यासोबत दीड शतकी भागिदारी करत विदर्भाचा डाव सावरला. केरळच्या निधीश यानं विदर्भाचे दोन गडी बाद केले.   शेवटचं वृत्त हाती आलं तेव्ह...

January 6, 2025 12:58 PM January 6, 2025 12:58 PM

views 9

केरळमध्ये बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

केरळच्या इडुक्की जिल्ह्यात पुल्लूपाडा इथं राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळून अपघात झाला. यात दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांना मुंडक्कयम इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात तामिळनाडूहून तंजावरच्या सहलीवरून परतत असलेले प्रवासी होते.

December 30, 2024 1:40 PM December 30, 2024 1:40 PM

views 18

हँडबॉल राष्ट्रीय चँपियन स्पर्धेत वरिष्ठ पुरुषांच्या सामन्यात केरळनं विजेतेपद पटकावलं

वरिष्ठ स्तरावरच्या पुरुषांच्या हँडबॉल राष्ट्रीय चँपियन स्पर्धेत केरळनं चंडीगढचा ३४ - ३१ नं पराभव करत विजेतेपद पटकावले.  हा सामना काल केरळच्या चांगनासेरी मध्ये खेळवला गेला. केरळचा संघ पहिल्यांदाच  या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात  सैन्यदलाचा पराभव करत केरळचा संघ अंतिम फेरीत पोहोचला  होता तर चंदिगढनं भारतीय रेल्वेच्या संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.