September 6, 2024 8:26 PM September 6, 2024 8:26 PM

views 10

केनियामधल्या प्राथमिक शाळेत वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थी ठार, १४ विद्यार्थी जखमी

केनियामधल्या एका प्राथमिक शाळेच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत १७ विद्यार्थी ठार तर १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत. ९ ते १३ वर्ष वयोगटातले हे विद्यार्थी भर झोपेत असताना अचानक लागलेल्या आगींमुळं ही  दुर्घटना घडल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 

June 25, 2024 2:58 PM June 25, 2024 2:58 PM

views 21

बिगर-नाटो सहयोगी म्हणून अमेरिकेने केनियाची नियुक्ती केली

अमेरिकेने आपला एमएनएनए, म्हणजेच प्रमुख बिगर-नाटो सहयोगी म्हणून केनियाची नियुक्ती केली आहे. अमेरिकेच्या कायद्यानुसार एमएनएनए हा दर्जा, परदेशी भागीदार देशांना संरक्षण, व्यापार आणि सुरक्षा विषयक सहकार्याच्या क्षेत्रात काही लाभ मिळवून देतो.   केनियाचे राष्ट्राध्यक्ष विल्यम रुटो यांच्या गेल्या महिन्यातल्या अमेरिका भेटी दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केनियाला आपला प्रमुख बिगर -नाटो सहयोगी म्हणून नियुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं.