September 17, 2024 10:10 AM September 17, 2024 10:10 AM
8
कर्मचारी निवड आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग करण्यास केंद्र सरकारची संमती
कर्मचारी निवड आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या विविध टप्प्यांवर उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार क्रमांकाचा उपयोग करण्यास केंद्र सरकारनं संमती दर्शवली आहे. आयोगाच्या परीक्षा आणि प्रत्यक्ष भरतीच्या विविध स्तरांवरदेखील उमेदवाराची ओळख सिद्ध करण्यासाठी आधार क्रमांक वापरला जाणार असल्याचं यासंदर्भातल्या राजपत्रित अध्यादेशात म्हटलं आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांकडून गैरमार्ग अवलंबले जाण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय जाहीर केला.