October 7, 2025 12:22 PM October 7, 2025 12:22 PM

views 48

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर उद्या भारत दौऱ्यावर

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर उद्या भारत दौऱ्यावर येत आहेत. स्टार्मर यांची ही पहिलीच भारत भेट आहे. ९ ऑक्टोबर रोजी स्टार्मर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मुंबईत भेट घेतील आणि भारत-ब्रिटन द्विपक्षीय संबंधाचा आढावा घेतील. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, संरक्षण आणि सुरक्षा, पर्यावरण आणि ऊर्जा, आरोग्य, शिक्षण अशा विविध क्षेत्रांबाबत दोन्ही देशांमधे दहा वर्षांच्या भागीदारीचं धोरण आखण्यात आलं आहे. यावेळी दोन्ही नेते विविध उद्योगांच्या प्रमुखांशीही चर्चा करणार आहेत. तसंच प्रादेशिक आण...

July 6, 2024 1:08 PM July 6, 2024 1:08 PM

views 16

ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये २९ भारतीय वंशाचे संसद सदस्य

  ब्रिटनचे नवे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटीश खासदार लिसा नंदी यांची संस्कृती, माध्यम आणि क्रीडा या विषयांसाठीच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. लिसा या उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील विगनमधून प्रचंड बहुमताने पुन्हा निवडून आल्या आहेत. लिसा या कोलकात्याचे शिक्षण तज्ञ दिपक नंदी यांच्या कन्या आहेत. ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सुमारे २९ भारतीय वंशाचे संसद सदस्य विक्रमी संख्येने निवडून आले आहेत.