May 2, 2025 11:35 AM May 2, 2025 11:35 AM

views 23

उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज उघडण्यात आले. हिवाळ्यात सहा महिने बंद राहिल्यानंतर आज मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. मंदिर १०८ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री सीएम पुष्कर सिंह धामी यांनी सपत्नीक केदारनाथाचं दर्शन घेतलं.

August 6, 2024 8:09 PM August 6, 2024 8:09 PM

views 17

केदारनाथधाम परिसरात सुरु असलेलं बचाव कार्य जवळपास पूर्ण

उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथधाम परिसरात सुरु असलेलं बचाव कार्य जवळपास पूर्ण झालं आहे, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिली. दरड कोसळण्याच्या घटना आणि अतिवृष्टीमुळे या भागात अडकलेल्या १२ हजारांहून अधिक यात्रेकरूंना विक्रमी वेळेत सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं, असंही त्यांनी सांगितलं.  केदारनाथधाम साठी उद्यापासून हेलिकॉप्टर सेवा बहाल केली जाणार असून  यात्रा मार्ग पूर्ववत करण्यासाठी सरकार जलद गतीनं काम करत असल्याचं ते म्हणाले.  

August 2, 2024 1:56 PM August 2, 2024 1:56 PM

views 11

उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित

उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्यामुळे यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातले रस्ते, पूल, विजेच्या तारा आणि पाणीपुरवठा वाहिन्यांचं तसंच शेतजमिनींचं मोठं नुकसान झालं आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, डीडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने एकत्रितपणे राबवलेल्या बचाव मोहिमेत केदारनाथ यात्रेच्या मार्गावर अडकलेल्या २ हजाराहून जास्त यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. वायुसेनेच्या विमानांनी भिंबली, रामबाडा आणि लिंचोली इथून अंदाज...

August 1, 2024 8:24 PM August 1, 2024 8:24 PM

views 12

केदारनाथ धाम यात्रामार्गावर अडकलेल्या ४२५ यात्रेकरू सुरक्षित स्थळी पोहचले

उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम यात्रामार्गावर अडकलेल्या ४२५ यात्रेकरूंना रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या लींचोली आणि भिम्बली इथून हेलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थळी पोहचवण्यात आलं आहे. विविध ठिकाणांहून सुमारे चौदाशे यात्रेकरू बचाव पथकाच्या मदतीनं पायी चालत सोनप्रयागला पोहचले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्याच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची हवाई पाहणी केली आणि आपत्तीग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं.   दरम्यान, हवामान विभागानं उद्या उत्तर काशी ...