October 21, 2024 10:24 AM October 21, 2024 10:24 AM

views 4

काश्मीर खोऱ्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन

काश्मीर खोऱ्यात श्रीनगरमध्ये काल पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पोलो व्ह्यू इथून मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. 42 किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन आणि 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉनमध्ये देशभरातील सतराशेहून अधिक धावपटू आणि 12 परदेशातील खेळाडूंनी भाग घेतला. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी मॅरेथॉनमधील विजेत्यांचा सत्कार केला. गेल्या काही वर्षांत विक्रमी संख्येनं पर्यटकांचं आगमन या भागातील शांतता, प्रगती आणि समृद्धीची साक्ष असल्याची भावना सिन्...

July 19, 2024 3:35 PM July 19, 2024 3:35 PM

views 4

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या यात्रेकरूंची एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना

अमरनाथ यात्रेसाठी जम्मू मधल्या भगवती नगर यात्री निवास बेस कॅम्पमधून आज ४ हजार ८२१ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाली. दीडशे वाहनांच्या ताफ्यासह यात्रेकरूंनी आज पहाटे बेस कॅम्प सोडला. यापैकी एक हजार ७३१ यात्रेकरू काश्मीर खोऱ्यातल्या बालताल बेस कॅम्पकडे, तर तीन हजार ९० यात्रेकरू पहेलगाव इथल्या बेस कॅम्प कडे रवाना झाले. तिथून पुढे ते अमरनाथ गुंफांकडे मार्गस्थ होतील.