August 23, 2025 1:13 PM

views 7

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हिमनदी फुटल्यामुळे महापूर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये गिलगिट-बाल्टिस्तानच्या घिझर जिल्ह्यात हिमनदी फुटल्यामुळे महापूर आला असून, भूस्खलन झाल्यामुळे  ३०० पेक्षा जास्त घरं  आणि दुकानं उद्ध्वस्त झाली आहेत.   या भागातला मोठा भूप्रदेश पुराच्या पाण्याखाली आल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत २०० पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचं वृत्त आहे.

January 2, 2025 8:12 PM

views 18

कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्था उध्वस्त केल्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद केवळ नियंत्रितच केला नाही, तर कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्थाच उध्वस्त केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत जम्मू-कश्मीरवरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनानंतर बोलत होते.  ३७० वं कलम हटवल्यानंतर दहशतवादी कारवायांमधे ७० टक्के इतकी लक्षणीय घट दिसून आली आहे. त्याबरोबरच जम्मू-कश्मीरचा विकासही सुुरु झाला आहे, असं ते म्हणाले. 

August 21, 2024 12:48 PM

views 24

काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी केंद्र सरकारने निमलष्करी दलाच्या जवळपास तीनशे तुकड्या तैनात केल्या आहेत.  यात सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपी या निमलष्करी दलांचा समावेश आहे. श्रीनगर, हुंदवडा, गंदेरबाल, बडगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियां, पुलवामा, अवंतीपोरा, आणि कुलगाम जिल्ह्यात निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.    तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीची पहिली अधिसूचना काल जाहीर करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातलं मतदान १८...

June 29, 2024 8:13 PM

views 20

अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात

अमरनाथ यात्रेला आज सुरुवात झाली. अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतल्या भगवती नगर बेस कॅम्प इथून आज पहाटे चार हजार २९ यात्रेकरूंची दुसरी तुकडी रवाना झाली. कडेकोट सुरक्षेसह यात्रेकरूंच्या २०० वाहनांचा ताफा काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला. तत्पूर्वी बेस कॅम्पचा परिसर बम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. जम्मू बेस कॅम्प इथून आतापर्यंत आठ हजार ६३२ यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. हेलिकॉप्टर सेवेद्वारे पोहोचलेल्या तीन हजारहून अधिक यात्रेकरूंनी आज  पवित्र गुफेत शिवलिंगाचे दर्शन घेत...

June 16, 2024 2:41 PM

views 27

जम्मू – काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. जम्मू -काश्मीरमध्ये अलिकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या सुरक्षा स्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात येत आहे.   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला या बैठकीला उपस्थित आहेत. गुप्तचर विभागाचे संचालक, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नवनियुक्त लष्करप्रमुख उपें...