December 1, 2024 3:18 PM December 1, 2024 3:18 PM
16
‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे काश पटेल यांची नियुक्ती
अमेरिकेच्या ‘एफबीआई’ अर्थात, ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे काश पटेल यांची नियुक्ती झाली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ही नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर अमेरिकेच्या प्रशासनातली भारतीय वंशाचे असलेल्या दुसऱ्या व्यक्तीची ही नेमणूक आहे. काश हे एक उत्तम वकील आणि अन्वेषक असून भ्रष्टाचार उघडकीला आणण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.