October 13, 2025 1:36 PM October 13, 2025 1:36 PM

views 18

करुर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या करूर इथल्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले.    तामिळनाडूत करूर इथं गेल्या २७ सप्टेंबरला विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम- TVK पक्षाच्या  जाहीर सभेच्या ठिकाणी  झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयानं दिले होते. या आदेशाला TVK पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.  ...