November 6, 2024 6:17 PM November 6, 2024 6:17 PM

views 9

कार्तिकी यात्रेनिमित्त ३ विशेष अनारक्षित रेल्वेगाड्या

पंढरपूर इथं होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे ३ विशेष अनारक्षित गाड्या चालवणार आहे. ८ ते १५ नोव्हेंबरदरम्यान विविध स्थानकांवरून या गाड्या चालवण्यात येणार आहेत. लातूर-पंढरपूर-लातूर ही गाडी १२ आणि १३ नोव्हेंबरला चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे.          

November 5, 2024 2:57 PM November 5, 2024 2:57 PM

views 12

पंढरपूरचं विठ्ठल मंदिर आजपासून दर्शनासाठी २४ तास खुलं

श्रीक्षेत्र पंढरपूर इथं कार्तिकी एकादशी निमित्त आजपासून श्री विठ्ठलाचं दर्शन भाविकांसाठी २४ तास खुलं राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. कार्तिकी यात्रा संपेपर्यंत विठ्ठल मंदिर चोवीस तास भाविकांसाठी खुलं असणार आहे.