December 26, 2025 8:08 PM December 26, 2025 8:08 PM

views 9

कर्नाटकातल्या हेलियम सिलिंडरच्या स्फोटामुळं दोघांचा मृत्यू

कर्नाटकातल्या म्हैसूर पॅलेस जवळ झालेल्या हेलियम सिलिंडरच्या स्फोटामुळं मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या आता दोनवर पोचली आहे. मृतांमध्ये गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेत अन्य काही नागरिकही जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.    कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी परमेश्वर यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटकच्या पर्यटन विभागानं  आवश्यक कार्यवाही करायला सुरुवात के...

June 13, 2025 9:51 AM June 13, 2025 9:51 AM

views 11

कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू

कर्नाटकातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीलगतचा भाग, उत्तरेकडील बेळगावी, धारवाड, गडग, हवेरी, दक्षिण अंतर्गत प्रदेशातील चिकमंगलूर, कोडगू, शिवमोगा आणि दावणगेरे इथं जोरादार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.

May 30, 2025 1:42 PM May 30, 2025 1:42 PM

views 19

कर्नाटकमध्ये मंगळुरू जिल्ह्यात भूस्खलनात एका मुलीचा मृत्यू

कर्नाटकमध्ये मंगळुरू जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मंगळुरू विभागात २ जूनपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

February 4, 2025 1:35 PM February 4, 2025 1:35 PM

views 12

३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांच्या पदकतालिकेत कर्नाटकची अव्वल स्थानी झेप

उत्तराखंडमधे सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे कर्नाटकने काल एका दिवसात ७ पदकं मिळवून पदकतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. तर महाराष्ट्राने पदकांची साठी ओलांडत सर्वाधिक पदकं मिळवण्याचा मान कायम राखला आहे. कर्नाटकाला आतापर्यंत २२ सुवर्ण तर प्रत्येकी दहा रौप्य आणि कांस्य पदकं मिळाली सेनादलांचा संघ १९ सुवर्ण, १० रौप्य आणि ९ कांस्य पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्राने १५ सुवर्ण , २६ रौप्य आणि २० कांस्य अशी एकूण ६१ पदकं मिळवली आहेत.

January 22, 2025 8:11 PM January 22, 2025 8:11 PM

views 20

कर्नाटकातल्या अरबाईल घाटात झालेल्या रस्ता अपघातात १४ जणांचा मृत्यू

कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यात येल्लापूरजवळ झालेल्या रस्ता अपघातातल्या मृतांची संख्या १४ झाली आहे. आठवडी बाजाराकरता फळं आणि भाज्या वाहून नेणारा ट्रक सावनूरहून कुमठ्याला जात असताना दरीत कोसळून हा अपघात झाला. त्यात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींपैकी ५जण रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावले. आणखी १५ जणांवर उपचार सुरु आहेत.   राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक प्रकट केला आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प...

January 6, 2025 8:56 PM January 6, 2025 8:56 PM

views 11

देशात HMPV संसर्गाच्या ३ रुग्णांची नोंद, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा सरकारचा निर्वाळा

देशातल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरस एचएमपीव्हीच्या एकूण रुग्णांची संख्या ३ झाली आहे. बेंगळुरूमध्ये ३ महिन्यांची मुलगी आणि ८ महिन्यांच्या मुलामधे तर अहमदाबादमध्ये २ वर्षाच्या मुलात एचएमपीव्हीचा संसर्ग आढळला आहे. अहमदाबाद इथं मुलाला सर्दी-खोकल्याची लक्षणं तर बेंगळुरूतल्या दोघांनाही ब्रॉन्कोन्यूमोनियाचा त्रास होता. तिघांचीही प्रकृती स्थिर असून बाधित रुग्णांपैकी कोणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.   एचएमपीव्हीशी संबंधित श्वसनाच्या आजारांची प्रकरणं विशेषत: चीन, मलेशिया आणि विविध देशांमध्ये ...