December 25, 2025 1:41 PM December 25, 2025 1:41 PM

views 5

कर्नाटकात चित्रदुर्ग इथं झालेल्या अपघातात किमान १० जण ठार

कर्नाटकात चित्रदुर्ग इथं आज पहाटे झालेल्या अपघातात किमान १० जण ठार झाले. एक भरधाव ट्रक एका प्रवासी बसला आदळून तिला आग लागली आणि बसमधले प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.  कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही या अपघात...

January 18, 2025 1:52 PM January 18, 2025 1:52 PM

views 12

मैसुरू शहर विकास प्राधिकरण प्रकरणी ३०० कोटी रुपयांचा मालमत्ता जप्त

सक्तवसुली संचालनालयाने कर्नाटकातल्या मैसुरू शहर विकास प्राधिकरण प्रकरणी ३०० कोटी रुपये किमतीच्या १४२ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. प्राधिकरणाने केलेल्या जमीन वाटपात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने ही कारवाई केली आहे. मैसुरू शहर विकास प्राधिकरणानं १४ जमिनी सिद्धरामय्या यांच्या पत्नी बी. एम. पार्वती यांच्या नावे केल्याचा आरोप आहे.   प्राधिकरणाने या १४ जमिनींखेरीज अन्य काही जमिनी रिअल इस्टेट व्यावसायिकांना भरपाई म्हणून बेकायदेशीररित्या वाटल्या होत्या. त्या जमिनी व...

August 17, 2024 2:53 PM August 17, 2024 2:53 PM

views 16

मैसूरू शहरी विकास प्राधिकरण भूखंड घोटाळा प्रकरणी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांवर खटला सुरू

मैसूरू शहरी विकास प्राधिकरण भूखंड घोटाळा प्रकरणी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी दिली आहे. गेहलोत यांनी २६ जुलै रोजी सिद्धरामय्या यांना कारणे दाखवा नोटिस बजावून, त्यांच्यावर खटला का चालवण्यात येऊ नये, याची कारणं सात दिवसांच्या आत देण्याची सूचना केली होती. कर्नाटक मंत्रिमंडळानं याला विरोध केला होता आणि राज्यपाल घटनात्मक पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. सिद्धरामय्या यांनी मैसूरू शहरी विकास प्राधिकरणाचे पर्यायी ...