February 16, 2025 3:43 PM February 16, 2025 3:43 PM
2
कर्नाळा पक्षी अभयारण्यात विद्यार्थ्यांवर मधमाश्यांचा हल्ला, एकाचा मृत्यू
रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यामधल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर काल मधमाश्यांनी हल्ला केला. या घटनेत कोपरखैरणे इथल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर माटुंग्याच्या व्ही जे टी आय महाविद्यालयाचे ७ विद्यार्थी जखमी झाले. जखमींवर पनवेलमधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.