November 8, 2024 3:32 PM November 8, 2024 3:32 PM

views 4

कर्मयोगी सप्ताहअंतर्गत सहभागींनी ३८ लाख तासांहून अधिक तास अभ्यास केला – सरकार

कर्मयोगी सप्ताह या राष्ट्रीय शिक्षण सप्ताह उपक्रमा अंतर्गत सहभागींनी ३८ लाख तासांहून अधिक तास अभ्यास केल्याचं सरकारने सांगितलं आहे. १९ ते २७ ऑक्टोबर या काळात चार लाख तीन हजार जणांनी किमान चार तास अभ्यास केला. या उपक्रमात ४५ लाख अभ्यासक्रमाची नोंद करण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे.