August 17, 2024 2:50 PM August 17, 2024 2:50 PM

views 10

उत्तर प्रदेशमध्ये कानपूर जिल्ह्यात साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून घसरले

उत्तर प्रदेशमध्ये कानपूर जिल्ह्यात साबरमती एक्सप्रेसचे २० डबे रुळावरून घसरले. ही गाडी वाराणसीहून अहमदाबादकडे जात असताना कानपूर रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. तीक्ष्ण वस्तूवर इंजिन आपटल्यामुळे डबे घसरल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात दिली आहे. या अपघातात जीवितहानी झाली नाही.