December 31, 2025 3:21 PM
42
मुंबईची काम्या कार्तिकेयन ठरली दक्षिण ध्रुवावर स्कीईंग करणारी सर्वात तरुण भारतीय
मुंबईच्या काम्या कार्तिकेयन या तरुणीनं दक्षिण ध्रुवावर स्कीईंग करणारी सर्वात तरुण भारतीय होण्याचा विक्रम केला आहे. जागतिक पातळीवर ती दुसरी सर्वात कमी वयाची तरुणी आहे. उणे ३० डिग्री सेल्सियस तपमानात तिने दक्षिण ध्रुवावर सुमारे ११५ किलोमीटर स्कीईंग केलं. शनिवारी तिने हा विक्रम केल्याची माहिती भारतीय नौदलानं काल दिली. मुंबईतल्या नौदलाच्या शाळेत ती शिक्षण घेते आहे आणि तिचे वडील नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.