June 30, 2024 6:33 PM June 30, 2024 6:33 PM
13
ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांचं हृदयविकारानं निधन
नांदेड इथले ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांचं आज हृदयविकारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. जोशी यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्यकाळात जिल्ह्यातल्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. निवृत्तीनंतर त्यांनी ब्लॉगद्वारे वेगवेगळ्या प्रश्नावर मतं मांडली. वेगवेगळ्या वृत्तपत्रातूनही ते स्तंभलेखन करत होते. कमलाकर जोशी यांच्या निधनानं एक अभ्यासू पत्रकार गमावला, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दुःख व्यक्त केलं आहे.